स्टोरी

ब्रेकिंग न्यूज..! सावरवाड येथे कारचालकाचा ताबा सुटल्याने कार चक्क दुकानात घुसली..!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावरवाड येथे भरधाव वेगात वाहन चालवत रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानात कार घुसली अन दुकान मालक काका म्हाडगूत यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर दुकानातील फ्रिज तसेच आधी सामान नाचे मोठे नुकसानी झाली आहे. ही घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. कलंबिस्त येथून सावंतवाडी कडे येणारी कार भर गाव वेगात होती सावरवाड विठ्ठल मंदिर जवळ ही कार येताच वाहन चालकाने रस्त्याच्या साईड पट्टीला जात बाजूलाच असलेले दुकानात कार घुसली.

सुदैवाने यावेळी कोणीही ग्राहक दुकानाकडे नव्हते अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.  कार मधील अन्य दोघेजण ही घटना घडतात पळून गेले. तर चालकाने सदर कार दुकानात घुसवल्यानंतर दुकानातील मालक श्री माडगूत यांना धक्का बसला. गाडीचा वेग एवढा होता की कार दुकानात घुसताच मोठा आवाज आला. मालकाच्या पायावर सामान पडले. तसेच कारचा धक्का लागल्याने पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे उपचारासाठी तात्काळ त्यांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सदर कार दुकानात घुसल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सदर दुकान मालकाला उपचारासाठी दाखल केले. भर वस्तीत ही घटना घडल्याने आणि सदर कार ही बाहेर गावातील होती. त्यामुळे या पंचक्रोशीत बाहेरगावातून काही मंडळी जमीन व आधी व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात येजा करत आहेत. त्यात सदर व्यक्ती ही भरगाव वेगात वाहन चालवत होती. त्यामुळे दुकानात कार घुसून मोठे नुकसान झाले आहे. नेमकी कार कोणाची याबाबत कोणती कल्पना नव्हती. त्याचा शोध सुरू होता. अधिक तपास करण्यात येत आहे. मात्र पोलीस ठाण्यात कोणती नोंद करण्यात आली नाही. मात्र पोलिसांना याबाबत कळवण्यात आले होते.

फोटो: सावंतवाडी सावरवाड येथे दुकानात कार घुसून असे नुकसान झाले आहे.

छाया: शिवाजी उर्फ राजू सावंत, कलंबिस्त


Spread the love

Related posts

सौ.विशाखा पालव यांचे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यश.

news

छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयातील पुरातन वस्तूंचे जतन करण्यास प्रारंभ.

news

महेश गायकवाड यांच्या मध्यस्थीने सेंट थॉमस स्कूलने केलीली १५ टक्के फी वाढ अखेर रद्द !

news

Leave a Comment