स्टोरी

अक्कलकोट ​श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात २५ रोजी गुरुप्रतिपदा उत्सव…!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने रविवार २५ फेब्रुवारी रोजी माघ वद्य प्रतिपदा ‘गुरुप्रतिपदा ‘ उत्सव वटवृक्ष मंदिरात साजरा होत आहे. गुरुप्रतिपदेनिमित्त पहाटे ५ वाजता पुरोहित मोहन गुरुजी व मंदार महाराजांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींची काकड आरती संपन्न होईल. यानंतर मंदिर स्वामी भक्तांकरीता दर्शनास खुले करण्यात येईल. गुरुप्रतिपदे निमित्त जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना श्रीफळ, खडीसाखर प्रसाद देणेत येईल. त्यानंतर सकाळी ०८:३० वाजता ज्योतिबा मंडपात मंदार महाराज पुजारी व ब्रम्हवृंदांच्या मंत्रोच्चारात देवस्थानचे लघुरुद्र अभिषेक होईल. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीच्या वतीने सोय करण्यात आली असून गर्दीमध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नये व स्वामी भक्तांच्या सुरक्षिततेकरिता पोलीस बंदोबस्ताचीही मागणी करण्यात आली आहे. दुपारी ११:३० वाजता नैवेद्य आरती नंतर देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानकडून सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात येणार आहे. सायंकाळी ५ ते रात्री ०९:३० या वेळेत अक्कलकोट शहरातून भजन, दिंड्यांसह सवाद्य पालखी सोहळा संपन्न होईल. हा पालखी सोहळा वटवृक्ष मंदिरातून फत्तेसिंह चौक, मेन रोड, कारंजा चौक, समाधी मठ, परतीचा मार्ग बुधवार पेठ, कारंजा चौक मार्गे, मौलाली गल्ली, सुभाष गल्ली, गुरु मंदिर, भारत गल्ली, स्वामी गल्ली मार्गे रात्री साडे नऊ वाजता पालखी सोहळा वटवृक्ष मंदिरात येईल. वटवृक्ष मंदिरात पालखी सोहळा आल्यानंतर गुरु भजन होवून देवस्थानकडून उपस्थित सर्व भाविकांना शिरा प्रसाद वाटप करणेत येऊन गुरु प्रतिपदा उत्सवाचा सांगता समारंभ होईल. तरी सर्व भाविकांनी श्रींच्या व पालखी सोहळा दर्शनाचा, सेवेचा, व भोजन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

देवसु वनपरीमंडळ नजीकच्या धोकादायक वळणावर लोकसहभागातून बसवला बहिर्वक्र आरसा…!

news

देशात कोरोना रुग्णांच्या संखेत वाढ

news

नवरात्रौत्सव शांततेत व सलोख्यात पार पाडण्यासाठी मंडळांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी! पोलीस निरीक्षक अरुण पवार

news

Leave a Comment