स्टोरी

भाजप ओबीसी महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सदस्यपदी तुळस ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार यांची निवड…!

Spread the love

वेंगुर्ला प्रतिनिधी: भाजप ओबीसी महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सदस्यपदी वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावचे ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा आढावा घेऊनच भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नारायण कुंभार यांची भाजप ओबीसी महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सदस्यपदी निवड केली आहे. भाजप ओबीसी महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नारायण कुंभार यांचे सर्वस्तरावरून अभिनंदन होत आहे. यापूर्वी नारायण कुंभार यांनी भाजप युवा मोर्चा वेंगुर्ला च्या सरचिटणीस पदावर काम केले आहे.

भाजप ओबीसी महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा  सदस्यपदी निवड झाल्यानंतर नारायण कुंभार म्हणाले की, “भाजपा ओबीसी महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा  सदस्यपदी माझी निवड करण्यात आली. पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थकी लावीन. तसेच पक्षाने आखून दिलेल्या ध्येयधोरणांप्रमाणे तळागाळाच्या कार्यकर्त्यापासून ते नागरिकांपर्यत पोहचत पक्ष बळकटीसाठी व राष्ट्रीय विचारधारेसाठी , हिंदूत्वासाठी सदैव तत्पर राहणार आहे.”


Spread the love

Related posts

२५ तारखेनंतर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण आणि नेत्यांना गावबंदी?

news

शारदा विद्यालय तुळस कुंभारटेम्ब येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

news

JNUच्या राष्ट्रीय परिसंवादात डॉ. ज्योती तोरसकर यांचा सहभाग..! मोरयाचा धोंडा विषयावरील संशोधनाचे दिल्लीत होणार सादरीकरण

newss

Leave a Comment