शिक्षण

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड ‘इंग्रजी’ विषय परीक्षेत घवघवीत यश.

Spread the love

सिंधुदुर्ग: स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी SOF ऑलिम्पियाड ‘ इंग्रजी ‘ विषय परीक्षेत घवघवीत यश मिळविले. या परीक्षेत एकूण तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांपैकी इयत्ता दुसरी मधील ‘कु. प्रार्थना प्रणय नाईक ‘ हिने सुवर्णपदक पटकावले व शाळेत प्रथम क्रमांकाने ती उत्तीर्ण झाली. तर, ‘कु. वेद हरेश बेळगावकर’ याने सुवर्णपदक प्राप्त केले व शाळेत द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच ‘ कु. शिवेन मयुर पेडणेकर ‘ याने सुवर्णपदक व शाळेत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

इयत्ता पाचवी मधील ‘ कु. अस्मि धीरज सावंत ‘ हिने सुवर्णपदक प्राप्त करून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. व ‘कु.अस्मि धीरज सावंत ‘ हिला इंग्रजी विषय ऑलिम्पियाड मधील पुढील टप्प्यासाठी निवडले गेले. त्याचप्रमाणे,  सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना शालेय मुख्याध्यापिका व सहा. शिक्षिका सौ. दिशा कामत यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे, शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांना अशा स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याकरिता प्रोत्साहन दिले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Related posts

दहावीच्या परीक्षा वेळापत्रकात बदल!

news

कारिवडे ग्रामपंचायतीकडून शाळा नं.१ ला संगणक भेट..! तसेच शैक्षणिक साहित्य वाटप.

news

बिळवसची हर्षिता पालव एनटीएस मध्ये देशात प्रथम…!

news

Leave a Comment