स्पोर्ट

माजी नगरसेवक व पत्रकार यांच्यात रविवारी रंगणार मैत्रीपूर्ण सामना…!

Spread the love

सावंतवाडी: सावंतवाडी नगरपरिषद चे माजी नगरसेवक व सावंतवाडीतील पत्रकार यांच्यात हलक्या चेंडूचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना येथील स्वार हाॅस्पीटल च्या समोरील मैदानावर रविवारी १४ जानेवारीला सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मैत्रीपूर्ण सामन्यात पत्रकार तसेच माजी नगरसेवक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांनी पत्रकातून केले आहे.

सावंतवाडीतील पत्रकार व नगरसेवक यांच्यात दरवर्षी मैत्रीपूर्ण क्रिकेट सामने होत होते.पण मागील चार ते पाच वर्षांत ही परंपरा खंडित झाली होती मात्र आता पुन्हा एकदा असे सामने होण्यासाठी माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांच्यासह सर्वच माजी नगरसेवकांनी पुढाकार घेतला असून त्यातून हा सामना होणार आहे.

यासाठी पत्रकार व माजी नगराध्यक्ष नगरसेवक यांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांच्याकडून करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

गोव्यात प्रथमच ‘सी 20 परिषदे’चे आयोजन!

news

तेजस्विनी विरेंद्र आचरेकर ह्यांची राष्ट्रिय तायक्वांडो कॅडेट स्पर्धा महाराष्ट्र संघ प्रशिक्षकपदी निवड!

news

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबोली यांच्यावतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेस उदंड प्रतिसाद…!

news

Leave a Comment