स्टोरी

सुंदरवाडी मिनी महोत्सवाला पहिल्याच दिवशी शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

Spread the love

सावंतवाडी: २७ डिसेंबर पासून जनरल जगन्नाथराव भोसले स्मुर्ती उद्यान नगरपरिषद सावंतवाडी मध्ये सुरू झालेला मिनी महोत्सवला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची तुफान गर्दी झाली होती. २७ डिसेंबरला जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले होते कणकवली, वेंगुर्ला, मालवण, कुडाळ, नांदगाव, दोडामार्ग शिरोडा, सावंतवाडी अशा विविध ठिकाणावरून स्पर्धक आले होते. स्पर्धकांनी रोमांचक रेकॉर्ड डान्स सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी व दीपकभाई मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा मिनी महोत्सव आयोजित केला होता. आज दिनांक २८ डिसेंबर रोजी ओमकार कला मंच संपूर्ण सिंधुदुर्ग मध्ये गाजलेला विविध कलाकृतीने नटलेला सांस्कृतिक कार्यक्रम आज संध्याकाळी ठीक ७ वाजता सादर होणार आहे. तसेच पुढे तीन दिवस विविध कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.


Spread the love

Related posts

दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र ची सिंधुदुर्ग मधील शाळांना डिजिटल भेट..!

news

कोमसाप शाखा सावंतवाडी च्या वतीने उद्या ९ ऑगस्ट रोजी ‘क्रांती दिना’ चे आयोजन!

news

महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवगड आयोजित २० मे रोजी महिला तसेच महिला बचतगटांसाठी भव्य प्रशिक्षण शिबिर! संतोष मयेकर

news

Leave a Comment