स्टोरी

वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची बैठक शनिवारी

Spread the love

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना व जिल्हा व्यापारी संघ संलग्न सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची तातडीची सभा शनिवार दिनांक २/१२/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता सावंतवाडी नगरपालिकेच्या पत्रकार कक्षाच्या शेजारील सभागृह क्र.७, पहिला मजला येथे आयोजित करण्यात आली आहे.

महावितरण कंपनी कडून पुरविण्यात येणाऱ्या वीज सेवांमधील समस्यामुळे ग्राहकांमध्ये वारंवार आक्रोश होत असून आणि महावितरण कडून पुरविण्यात येणाऱ्या सेवांमधिल त्रुटींवर चर्चा करणे व डिसेंबर २०२३ मध्ये सावंतवाडीत वीज ग्राहक मेळावा घेण्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व तालुका कार्यकारिणी, तालुक्यातील जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन तालुका संघटना सचिव व अध्यक्षांकडून करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

डांगमोडे गावच्या श्री देव रवळनाथ मंदिरात श्री भवानी मातेचा गोंधळ उत्सव शुक्रवार दि. १७ मार्च २०२३ रोजी होणार

news

गेळे डुरेवाडी येथील श्री कुलदेवता बंडवसाचा पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारी ९ मे रोजी होणार.

news

रानभाज्यांचा रोजच्या आहारात वापर करा! प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती नाईक नवरे यांचे प्रतिपादन

news

Leave a Comment