स्टोरी

हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासूनच….!

Spread the love

३० नोव्हेंबर वार्ता: विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या कालावधीत होणार आहे. २९ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुटी वगळता हे अधिवेशन एकूण १० दिवस चालणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांसह विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते उपस्थित होते. यापूर्वी हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून चालू होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते; मात्र अधिवेशन ७ डिसेंबरपासूनच होणार असल्याचा निर्णय विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अंतिम करण्यात आला.


Spread the love

Related posts

छत्रपती शिवरायांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे !खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली मागणी!

news

छत्रपती संभाजीनगर येथे स्‍वतःचे मृत्‍यू प्रमाणपत्र घेऊन महिला पोचली पंचायत समितीत!

news

कल्याण पूर्वेतील प्रस्तावित यु टाईप रस्त्याच्या रुंदीकरणासाठी हरकती आणि सुचना सादर करण्यासाठी नोटीस जाहिर प्रसिध्द!

news

Leave a Comment