स्टोरी

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा !

Spread the love

२४ नोव्हेंबर वार्ता: कार्तिकी एकादशीच्या निमित्त येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अन् त्यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील श्री. बबन विठोबा घुगे आणि सौ. वत्सला बबन घुगे यांना पूजा करण्याचा मान मिळाला. घुगे हे मागील १५ वर्षांपासून न चुकता वारी करत आहेत. प्रथेप्रमाणे कार्तिकी एकादशीनिमित्त पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. ‘राज्यातील बळीराजाला सुखी ठेव’, अशी प्रार्थना श्री विठ्ठलाच्या चरणी केली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


Spread the love

Related posts

कोरोनामुळे पालघर जिल्ह्यात एकाचा मृत्यू

news

खैरतस्करांवर सावंतवाडी वन विभागाच्या फिरते पथक व सावंतवाडी परिक्षेत्र कार्यालयाची संयुक्त कारवाई! सावंतवाडीच्या पुष्पा गॅंगची धरपकड सुरू….

news

मराठा महासंघाच्या वतीने सावंतवाडी शहरात तीन दिवस कमर्शियल व्हेईकल एक्स्पोचे आयोजन..! अभिषेक सावंत

news

Leave a Comment