स्टोरी

माडखोल जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी योजना मंजुरी सभा बिडिओ सावंतवाडी यांच्या अध्यक्षतेखाली घ्यावी!…माडखोल ग्रामस्थांचे मागणी

Spread the love

सावंतवाडी: जलजीवन मिशन अंतर्गत माडखोल गावाला एक कोटी ऐंशी लाख एवढा निधी मंजूर आहे पण मागील ग्रामपंचायत च्या कालखंडात यावर काहीच हालचाल झाली नाही यामुळे हा निधी माडखोल गावाला फायदा होणार का असा संशय गावात व्यक्त होत आहे नवीन बॉडीने ४ वर्षे जुनी निरोपयोगी नळ पाणी योजना दुरुस्त करण्यासाठी या निधीचा वापर करायचा घाट घातला आहे यामुळे ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान होणार आहे सरपंच माडखोल आयत्या वेळेच्या विषयात हा विषय घातला व मंजूर केला त्यानंतर मासिक सभेमध्ये सुद्धा अजेंडावर विषय न ठेवता मंजूर केला याला जागरूक नागरिकांनी विरोध केला व ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता ओरस यांच्या कार्यालयासमोर उपोषण केले यावेळी उदयकुमार महाजनी अधिक्षक अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग ओरस यांनी पंधरा दिवसात ग्रामसभा भरून निर्णय घेण्याचे आदेश दिले पण सरपंचांनी पंधरा दिवसात ग्रामसभा घेतली नाही व नंतर ही ग्रामसभा ज्या ठिकाणी योजना राबवायचे आहे त्या भागात आयोजित केलीे नाही गावाच्या दुसऱ्या टोकाला आयोजित केली यालाही ग्रामस्थांनी विरोध केला मग ही ग्रामसभा रद्द करण्यात आली नंतर ही ग्रामसभा ग्रामपंचायत माडखोल या ठिकाणी आयोजित केली यावर ग्रामस्थांनी बहिष्कार घातल्याने हि तहकुब झाली सरपंच माडखोल यांच्यावर विश्वास राहिला नाही त्यामुळे ही ग्रामसभा गटविकास अधिकारी सावंतवाडी यांच्या अध्यक्षतेखाली माडखोल गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आयोजित करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे व मागणी मान्य न झाल्यास दि. २१ नोव्हेंबर २०२३  रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी ओरस सिंधुदुर्ग यांच्या कार्याला समोर उपोषण व आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


Spread the love

Related posts

बोरिवली ते मांडवा बस फेरी मार्ग पूर्ववत करा!

news

वेर्ले गावात भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन..!

news

विद्यासेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी जयवंत पाटील यांची निवड.

news

Leave a Comment