राजकारण

“तुम्हाला देश कायम अशांत ठेवायचाय का?” सर्वोच्च न्यायालयाने भाजपा नेत्याला सुनावलं!

Spread the love

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची जोरदार चर्चा आहे. ही सुनावणी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या बाबतीतली आहे. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयातील वेगळ्याच सुनावणीची चर्चा राष्ट्रीय स्तरावर सुरू झाली आहे. कारण देशपातळीवर घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करून केंद्रात ‘नावबदल आयोगा’ची स्थापना करण्याची मागणी करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली असून ती दाखल करणाऱ्या भाजपा नेत्याला परखड शब्दांत सुनावलं आहे.भाजपाचे दिल्लीतील नेते आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे अश्विनी कुमार उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये देशावर अतिक्रमण करणाऱ्या परकीय शासकांची किंवा व्यक्तींची देशातील विविध ऐतिहासिक ठिकाणांना देण्यात आलेली नावं बदलण्याच्या परवानगीची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी केंद्रीय पातळीवर नावबदल आयोगाची स्थापना करण्यात यावी, अशीही मागणी याचिकेत करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे.देशासमोरचे इतर प्रश्न संपलेत का? असा परखड सवाल न्यायालयाने यावेळी याचिकाकर्त्याला केला. “भूतकाळात घडलेल्या घडामोडी बदलण्याशिवाय आपल्याकडे इतर कोणत्या समस्या नाहीयेत का? भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. जर एका कुठल्यातरी धर्माच्या दिशेने अंगुलीनिर्देश करून तुम्हाला देश कायम अशांत ठेवायचा आहे का?” असा प्रश्न न्यायमूर्ती के. एम.जोसेफ यांनी उपस्थित केला. “हे धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाच्या विरोधात आहे. मी कदाचित इथे माझा संताप व्यक्त करू शकतो. अशा प्रकारच्या याचिकांनी भारताच्या धर्मनिरपेक्षतेला तडा जाऊ देऊ नका”, असंही न्यायालयाने अश्विनी कुमार उपाध्याय यांना सुनावलं.देश कायम पुढे जात राहाणं महत्त्वाचं आहे. कोणत्याही देशाचा इतिहास त्या देशाचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळावर अशा प्रकारे दहशत निर्माण करू शकत नाही जेणेकरून येणाऱ्या पिढ्या या भूतकाळातच अडकून पडतील”, असंही न्यायायलयाने यावेळी नमूद केलं.


Spread the love

Related posts

शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट यांच्या सर्व आमदारांना विधानसभेच्या अध्यक्षांची नोटीस!

news

शिंदे गटाचा आता थेट शिवसेना भवनावर दावा?….

news

महाराष्ट्राला काळीमा लावणारी घटना घडली. पत्रकारांकडे चौथा स्तंभ म्हणून आपण बघतो….. विरोधी पक्ष नेते अजित पवार

news

Leave a Comment