स्टोरी

श्री देव लिंगेश्वर आधी पंचायतन देवस्थान आजपासून कलंबिस्त धामणमळा येथील कुलदैवत श्री देवी सातेरी च्या भेटीला…..

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त धामणमळा येथील कुलदैवत श्री देवी सातेरी मंदिर येथे श्री देव लिंगेश्वर आधी पंचायतन देवस्थान आजपासून भेटीला गेले आहेत. विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी देवदेवतांची लग्न व सोने लुटण्याचा विधिवत कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दरवर्षी सर्व देवता पालखी मिरवणुकीसह श्रीदेवी सातेरी मंदिराच्या भेटीला जातात. यावर्षी आज बुधवारी २५ ऑक्टोबरला सर्व देवता वाजत गाजत पालखी मिरवणुकीने श्री सातेरी देवीच्या भेटीला गेले आहेत. २५ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत श्रीदेवी सातेरी मंदिर येथे सकाळपासून संपूर्ण दिवसभर जागर केला जाणार आहे. या निमित्ताने सकाळपासून पूजाअर्चा दुपारी आरती सायंकाळी आणि रात्री भजन व आधी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. श्रीदेवी सातेरी मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजवण्यात आला आहे.

आज २५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर या कालावधीपर्यंत या मंदिराकडे ओटी भरणे नवस फेडणे आधी कार्यक्रम होणार आहेत २९ ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता श्रीदेवी सातेरी मंदिरातून देवता पुन्हा श्री देव लिंगेश्वर मंदिरकडे येणार आहेत. तरी सर्वांनी श्रीदेवी सातेरी मंदिर जागर उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. या जागेवर उत्सवामुळे गणशेळवाडी ते धामण मळा सातेरी मंदिर चा परिसर सजून गेला आहे.


Spread the love

Related posts

कुडाळ रेल्वेस्थानक सुशोभीकरण कामात भ्रष्टाचार; बांधकामाला लागली गळती..! २.५ कोटी रु. गेले पाण्यात..! युवासेनेने आंदोलन करून केला पर्दाफाश.

news

राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य- दिव्य अश्वारूढ पुतळा उभारणार..! माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

प्रसाद परब

कोकणात दापोली तालुक्यात आढळला ‘रामगड किल्ला’!

news

Leave a Comment