Uncategorized

ओरोस फाटा येथे उद्या ” दैव जाणिले कुणी” नाट्यप्रयोग सादर…

Spread the love

रिक्षा चालक मालक संघाचे आयोजन..

ओरोस : सिंधूनगरी ऑटो रिक्षा चालक मालक सेवा संघाचा २७ वा वर्धापनदिन मंगळवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरा होत आहे. त्या कार्यक्रमानिमित्त ओरोस फाटा येथील शिवाजी महाराज पुतळ्या जवळ रिक्षा स्टँड येथे सकाळी ८.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १०.३० वाजता तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६ या वेळेत स्थानिकांची भजने, सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत वारकरी सांप्रदायिक हरिपाठ तसेच रात्री ९ वाजता मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ, मोरे यांचा “दैव जाणिले कुणी” हा दणदणीत पौराणिक नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. सर्वांनी उपस्थित राहून नाट्यप्रयोगाचा आनंद घ्यावा.


Spread the love

Related posts

आपल्याला एकमेकांविरोधात उभे राहून या शहराला विकासापासून दूर ठेवायचे नाही…! नगराध्यक्ष – श्रद्धा लखमसावंत भोसलें

प्रसाद परब

बांधकाम कामगार नोंदणीचा प्रश्न सोडविण्याबाबत शिवसेना शिष्टमंडळाचे जि.प. सी.ई.ओ. यांना निवेदन

news

जय जय राम कृष्ण हरी! दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी!

news

Leave a Comment