स्टोरी

शारदा विद्यालय तुळस कुंभारटेम्ब येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

Spread the love

वेंगुर्ला: नारायण कुंभार मित्र मंडळ च्या वतीने सर्व नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.२२ ऑक्टोबर २०२३ रोजी  शारदा विद्यालय तुळस तुळस कुंभारटेम्ब या ठिकाणी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० या वेळेत हे नेत्र शिबीर होणार आहे. या नेत्र शिबिराचे उदघाट्न सन्माननिय माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती भाजप चे तुळस ग्रामपंचायत सदस्य श्री नारायण कुंभार यांनी दिली आहे. या शिबिरात भारतातील प्रसिद्ध लॉरेन्स अँण्ड मेयो या कंपनीचे तज्ञ डॉक्टर नेत्र तपसणी करतील. तसेच या शिबिरात गरजू व्यक्तींना अगदी माफक दरात दर्जेदार चष्मा मिळणार आहे.

या शिबिरात सहभागी व्यक्तींची मोफत नेत्र तपसणी आणि मोफत मोती बिंदू शास्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नारायण कुंभार मित्र मंडळाच्या वतीने यापूर्वी हि मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून २५ व्यक्तींची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली आहे. तुळस ग्रामपंचायत सदस्य श्री नारायण कुंभार मित्र मंडळाचे हे समाजकार्य अनमोल असे आहे. आज समाजात अनेक गरजू गरीब व्यक्तींना मोतीबिंदूमुळे नीट बघता येत नाही. अशा गरजू व्यक्तींचे मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशन करून त्यांना नवीन दृष्टी देऊन नारायण कुंभार मित्र मंडळ समाजात आगळे वेगळे उत्कृष्ट असे काम करत आहे. या मोफत नेत्र तपसणी आणि मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिराला  जास्तच जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा :

नारायण कुंभार, संपर्क क्र. ९७६५७२९६९२

रोहित कुंभार, संपर्क क्र.    ७५८८४५८५४२

प्रसाद नाईक, संपर्क क्र.    ८७८८४७९३०८

राकेश ठुंबरे, संपर्क क्र.     ९८२०४७०४८४


Spread the love

Related posts

तुळस गावात राज्याच्या बाहेरील लोकांचे वास्तव्य आणि संशयास्पद वागण्याकडे ग्रामपंचायत आणि प्रशासनाचे दुर्लक्ष…!

news

पिग्मी एजेंट श्रीमती नमिता बांदेकर यांचा महिला नागरी संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व गोल्ड कॉईन देऊन सत्कार

news

देशातील ग्रामीण आणि शहरी भागांतील किशोरवयीन मुलांमध्ये वाढता ताण आणि उच्च रक्तदाब! – सर्वेक्षणाचा निष्कर्ष….

news

Leave a Comment