स्टोरी

मसुरे येथे जागतिक आपत्ती धोका निवारण दिन संपन्न…

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:

प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून योग्य ती काळजी घेतल्यास कोणत्याही आपत्ती वरती मात करता येते तसेच आपत्ती आल्यानंतर सर्वांनी स्वतः बरोबर दुसऱ्याची ही काळजी घेणे गरजेचे असते कोणत्याही आपत्तीत डगमगून न जाता शांतपणे प्रशासनाच्या तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे प्रशासन तुमच्या नेहमीच पाठीशी राहील असे प्रतिपादन सुहास चव्हाण यांनी मसूरे येथे बोलताना केले.

मसुरे मर्डे ग्रामसचिवालय येथे जागतिक आपत्ती धोके निवारण दिन मसुरे मंडल अधिकारी सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

यावेळी आपदा मित्र सौ प्रज्ञा बागवे, आपदा मित्र ऐश्वर्या घडीगावकर, तलाठी एस पी लखमोड, पोलीस पाटील प्रेरणा येसजी, तलाठी वाय बी राजुरकर, कोतवाल सचिन चव्हाण, संतोष चव्हाण, जिल्हा परिषद शिक्षक विनोद सातार्डेकर, नवनाथ गोसावी, बाबू येसजी, गिरकर मॅडम, शैलेश मसुरकर, विनोद मोरे,सुदर्शन मसुरकर, मानसी पेडणेकर, श्रेया मगर, चैतन्य भोगले, समर्थ दुखंडे, नेहा शिंगरे, आयुष दूखंडे, यशस्वी कातवणकर, मोक्षता कातवणकर, स्नेहा मसुरकर, रिया भोगले आणि

अंगणवाडी सेविका आरोग्य सेवक जिल्हा परिषद शिक्षक विद्यार्थी महसूल कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन वाय बी राजूरकर यांनी केले. यावेळी आपला मित्र प्रज्ञा बागवे, ऐश्वर्या घाडीगावकर यांनी आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यानंतर कोणत्या उपयोजना कराव्या आणि त्याला कसे सामोरे जावे याबाबत माहिती दिली. तसेच विनोद सातार्डेकर यांनीही आपत्कालीन परिस्थितीत सामोरे जाताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी याबद्दल प्रात्यक्षिकांसहित माहिती दिली.

 

फोटो…

मसुरे येथे जागतिक आपत्ती धोका निवारण दिनानिमित्त मार्गदर्शन करताना मसुरे मंडळ अधिकारी सुहास चव्हाण सोबत मान्यवर..

छाया ..दत्तप्रसाद पेडणेकर.


Spread the love

Related posts

त्रिपुरा पोर्णिमा निमित्ताने शहरातील सर्व मंदिरे प्रकाशम करूया :- माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

news

कलंबिस्त येथील माध्यमिक हायस्कूलमध्ये मैदानावर योगा दिन उत्साहात साजरा!

news

कोकण श्री ग्राम सेंद्रिय फार्मर प्रोड्युसर कंपनीचे उद्घाटन संपन्न.

news

Leave a Comment