स्टोरी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय संरक्षण भिंत धोकादायक! प्रशासनाचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष…..

Spread the love

सावंतवाडी: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय संरक्षण भिंत धोकादायक असल्याबाबतचे पंधरा दिवसांपूर्वी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सावंतवाडी नगरपरिषद, बांधकाम विभाग, तहसीलदार ऑफिस व प्रांत ऑफिस या ठिकाणी निवेदनं दिली होती. परंतु अद्यापही कुठचेही प्रकारची कार्यवाही झाली नाही. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी नजीक संरक्षक भिंत आहे. ती भिंत अतिधोकादायक अवस्थेत असल्याने कधीही पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदरच्या भिंती ला लागूनच रुग्णालयात येण्याचा मुख्य रस्ता आहे. तसेच अत्यावश्यक सेवेचे कॅजुलिटीचा कक्ष असल्याने रुग्णवाहिका येत जात असतात.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर येवले यांना निवेदन देताना सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते संजय पेडणेकर शैलेश नाईक रवि जाधव.
सावंतवाडी तालुक्याचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देताना सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते संजय पेडणेकर शैलेश नाईक रवि जाधव.

प्रशासन सदरची भिंत पडून कोणाचा अपघाती बळी घेण्याची वाट बघत आहे का? जर अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी अशी अतिधोकादायक भीत ठेवणे म्हणजे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला मृत्यूचा सापळा लावल्या सारखे आहे. परतीच्या पावसामध्ये या भिंतीपासून दुर्घटना होण्याची संभावना आहे. तरी सदरची भिंत पासून दुर्घटना होण्याअगोदर ती पाडण्यात यावी अशी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व सर्वसामान्या नागरिकांमधून मागणी होत आहे.


Spread the love

Related posts

कलंबिस्त हायस्कूलच्या १९९७-९८ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…!

news

मनोहर उर्फ भाई महादेव मांजरेकर यांचे निधन.

news

गोव्यात प्रतिदिन होतो किमान एक जीवघेणा अपघात!

news

Leave a Comment