स्टोरी

पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्‍ये ‘लेझर’ प्रकाशामुळे २३ वर्षीय तरुणाची दृष्‍टी अधू झाली !

Spread the love

पुणे: श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्‍ये ध्‍वनीक्षेपकातील (डॉल्‍बी ध्‍वनीक्षेपण यंत्रणा) ‘लेझर लाईट’मुळे (विद्युत् चुंबकीय उत्‍सर्जनामुळे निर्माण झालेला प्रकाश) पुण्‍यातील अनिकेत शिगवण या २३ वर्षीय तरुणाच्‍या डोळ्‍यातील ‘रेटिना’ला (डोळ्‍यातील मधला भाग) दुखापत झाली. त्‍यामुळे त्‍याची अनुमाने ७० टक्‍के दृष्‍टी अधू झाल्‍याची माहिती ‘दूधभाते नेत्र रुग्‍णालया’चे आधुनिक वैद्य अनिल दूधभाते यांनी पत्रकार परिषदेमध्‍ये दिली. अनिकेतसारख्‍या घटना अनेक ठिकाणी घडल्‍या असल्‍याचे समोर येत आहे. राज्‍य सरकारने या ‘लेझर बीम’वर बंदी आणावी किंवा त्‍यावर निर्बंध घालावेत, यासाठी पाठपुरावा करणार असल्‍याचेही आधुनिक वैद्य दूधभाते यांनी सांगितले.ही ‘लेझर लाईट’ ५ मिलीवॅटपेक्षा अधिक होती. ती मनुष्‍याच्‍या डोळ्‍यांवर १० सेकंदासाठी जरी प्रकाशित झाली, तरी त्‍याचा ‘रेटिना’वर परिणाम होऊ शकतो. तसाच प्रकार अनिकेतवर झाला. त्‍यामुळे त्‍याच्‍या एका डोळ्‍यातील ‘रेटिना बर्ग’ (जळणे) होऊन त्‍याची दृष्‍टी अधू झाली.


Spread the love

Related posts

नळ पाईपलाईनसाठी रस्त्याला मारलेले आडवे चर तातडीने बुजवण्यास सुरुवात…!

news

मुसळधार पावसात नारायण ठाकूर यांचे घर जमीनदोस्त..!

news

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा! – मंत्री रवींद्र चव्हाण

news

Leave a Comment