स्टोरी

आमदारांच्‍या पात्रतेविषयीच्‍या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्‍याची काँग्रेसची मागणी!

Spread the love

मुंबई: शिवसेनेच्‍या आमदारांच्‍या पात्र-अपात्रेच्‍या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेचे अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांच्‍याकडे पत्राद्वारे केली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या शिवसेनेच्‍या दोन्‍ही गटांकडून सर्वोच्‍च न्‍यायालयात परस्‍परविरोधी याचिका करण्‍यात आल्‍या आहेत. यामध्‍ये उद्धव ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्‍या गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवण्‍यात यावे, अशी याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयात केली आहे. यावर विधीमंडळाने निर्णय घेण्‍याचे निर्देश सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिले आहेत. मागील आठवड्यामध्‍ये विधानसभेचे अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांनी याविषयीची पहिली सुनावणी घेतली.


Spread the love

Related posts

युवासेना कोकण सचिव मंदार शिरसाट यांना कोकण पदवीधरची उमेदवारी मिळावी..! सिंधुदुर्ग युवासेनेची मागणी

news

खासगी ट्रॅव्‍हल्‍सच्‍या विरोधातील तक्रारीसाठी स्‍वतंत्र ‘हेल्‍पलाईन’ क्रमांक द्यावा !

news

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तो धोकादायक खड्डा सिमेंट काँक्रेट ने बुजवला.

news

Leave a Comment