स्टोरी

‘भारत’ नाव करण्याचा प्रस्ताव आला, तर विचार करू ! संयुक्त राष्ट्रे

Spread the love

८ सप्टेंबर वार्ता: देशाचे अधिकृत नाव केवळ ‘भारत’ करण्याची चर्चा देशात चालू झाली आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्याकडून ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ असा करण्यात येत असलेला उल्लेख पहाता जनतेतूनही याची मागणी होऊ लागली आहे.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांचे उप प्रवक्ता फरहान हक
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांचे उप प्रवक्ता फरहान हक

या पार्श्‍वभूमीवर संयुक्त राष्ट्रांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. ‘जर संयुक्त राष्ट्रांमध्ये ‘भारत’ नाव करण्याविषयी प्रस्ताव आला, तर आम्ही यावर विचार करू’, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांचे उप प्रवक्ता फरहान हक यांनी म्हटले आहे.त्यांना या संदर्भात पत्रकारांकडून प्रश्‍न विचारण्यात आला होता. या वेळी हक यांनी ‘तुर्कस्थानने ‘तुर्कीए’ नाव करण्याची संयुक्त राष्ट्रांकडे मागणी केल्यावर आम्ही त्याला संमती दिली होती’, असेही सांगितले


Spread the love

Related posts

कांदळवन आणि सागरी जैव विविधता यांच्‍या उच्‍च शिक्षणासाठी राज्‍यशासनाकडून मिळणार शिष्‍यवृत्ती!

news

मुणगे तिठा हायमास्टच्या प्रकाशाने उजळला..! आम. नितेश राणे यांचे मानले ग्रामस्थांनी आभार

news

किल्ले सिंधुदुर्गवर आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा.

news

Leave a Comment