स्टोरी

महिला उत्कर्ष समिती कुडाळ चा ओरोस पोलिसांना रक्षाबंधन करून सण साजरा केला…

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: 

 

महिला उत्कर्ष समितीच्या कुडाळ तालुका अध्यक्ष दीपा ताटे यांनी आपल्या पदाधिकारी व सदस्यांसह ओरोस पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

महाराष्ट्र पोलीस म्हणजे महाराष्ट्रातील सर्व महिलांचा भक्कम आधार! या भक्कम आधाराच्या जोरावरच आजची स्त्री बिनधास्तपणे समाजात वावरत आहे.त्यामुळे आजच्या या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपले रक्षक असणाऱ्या ओरोस पोलीस बांधवांना दीपा ताटे, सचिव तन्वी सावंत,सदस्य रुपाली वरक,सुप्रिया वालावलकर, सुस्मिता राणे यांनी राखी बांधून रक्षाबंधन सणाचे महत्व जपले.

अनेक वेळा हे पोलीस बांधव आपल्या कुटुंबापासून, परिवारापासून दूर राहून समाजातील भगिनींचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र झटत असतात, रक्षाबंधन हा सण म्हणजे भावाने बहिणीच्या सुरक्षिततेची दिलेली हमी असते, आपल्या विभागात कार्यरत हे पोलीस बांधव समाजातील बहिणींच्या संरक्षणासाठी कर्तव्य तत्पर असतात याची जाणीव महिला उत्कर्ष समितीच्या कुडाळ अध्यक्ष दीपा ताटे यांनी ठेवून आपल्या सहकाऱ्यांसह विभागातील पोलीस जवानांना राखी बांधून या सणाचे महत्त्व जपले.


Spread the love

Related posts

अक्कलकोट ​श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात २५ रोजी गुरुप्रतिपदा उत्सव…!

news

मुख्‍यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ! प्रत्‍येक वर्षी १ जून ते १ जुलै या काळात ‘ई – केवायसी’ करावी लागणार.

news

दांडी आणि चिवला बीचवर सापडलेले ते “अंबरग्रीस, नसून पॉली ऍनाईल क्लोराईड पदार्थ! पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची माहिती

news

Leave a Comment