स्टोरी

चांद्रयान- २ ने केलं चांद्रयान-३ ‘विक्रम’ लँडरचं स्वागत!

Spread the love

२१ ऑगस्ट वार्ता: चांद्रयान ३ चंद्रावर उतरण्यासाठी फक्त दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. इस्रोकडून चंद्र मोहिमेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चांद्रयान-२ चे ऑर्बिटर आणि चांद्रयान-३ विक्रम लँडर यांच्यात संपर्क झाल्याची माहिती इस्रोने दिली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने सोमवारी सांगितलं की, चांद्रयान-२ ऑर्बिटर आणि चांद्रयान-३ लँडर मॉड्यूल ‘विक्रम’ यांच्यात यशस्वी द्विमार्गी संपर्क झाला आहे. चांद्रयान-३ आधीचं इस्रोचं मिशन चांद्रयान-२ चं ऑर्बिटर अद्यापही चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे.

२०१९ मध्ये इस्रोच्या चांद्रयान-२ चं यशस्वी प्रक्षेपण झाल्यापासून Ch-2 चं ऑर्बिटरने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. आता चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरचं स्वागत केलं आहे. चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरने चांद्रयान-३ च्या लँडरसोबत संपर्क करत संदेश पाठवला आहे. त्यामध्ये त्यानं म्हटलं आहे, “स्वागत मित्रा”.

 

इस्रोने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. इस्रोने सांगितलं की, चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरने चांद्रयान-३ च्या विक्रम लँडर मॉड्यूलचं स्वागत केलं आहे. या दोन्हींमध्ये दुतर्फा संवाद प्रस्थापित झाला आहे. आता बेंगळुरूमध्ये स्थित मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (MOX) मध्ये विक्रम लँडर मॉड्यूलसोबत संपर्क साधण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत.


Spread the love

Related posts

स्टार हेल्थ इंश्योरेंस, मेडिकल, एक्सीडेंट, और ट्रैवल इंश्योरेंस पॉलिसियां प्रदान करता है…! एक बार जरूर पढिये.

news

आपत्ती व्यवस्थापनाची रणशाळा – मुळदे महाविद्यालयात NDRF चा जिवंत अनुभव.

news

अखिल मुंबई कोकण प्रसादिक भजन मंडळाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

प्रसाद परब

Leave a Comment