स्टोरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आफ्रिकेत होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या परिषदेत उपस्थित राहणार!

Spread the love

१९ ऑगस्ट वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या परिषदेत उपस्थित राहणार आहेत. ब्रिक्स परिषद (BRICS Summit 2023) ही सोमवार दि.२२ ऑगस्ट ते बुधवार दि. २४ ऑगस्ट दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या दौऱ्याची शुक्रवारी माहिती दिली.

 

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी शुक्रवारी (२५ ऑगस्ट) रोजी ग्रीसला भेट देतील. ४० वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानांचा ग्रीस दौरा या निमित्ताने होणार आहे.

ब्रिक्स’ हे भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे. सुरुवातीला फक्त चार देश या संघटनेचे सदस्य होते आणि ‘ब्रिक’ या संक्षिप्त नावाने ओळखले जात होते. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिका देशही या गटात सहभागी झाल्यानंतर संघटनेचे नाव ‘ब्रिक्स’ झाले.

 

गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे , परस्परांतील आर्थिक सहकार्य वाढवणे, आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे , इत्यादी या संघटनेची उद्दिष्ट व कार्ये आहेत.


Spread the love

Related posts

कवी किशोर कदम लिखित बालविश्व काव्यसंग्रहाचे १५ मार्च रोजी प्रकाशन.

news

सह्याद्री फाउंडेशनचे सचिव प्रताप परब यांना मातृशोक….

news

कलंबिस्त ख्रिश्चनवाडी सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन…!

news

Leave a Comment