राजकारण

तलाठी परीक्षा केंद्र दुसऱ्या टप्प्यातही बाहेरच्याच जिल्ह्यात!योगेश धुरी,युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ

Spread the love

माजी आमदार राजन तेलीनी फेकूगिरी कमी करावी, ह्यांचा फोन तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उचलला असेल का ? हा संशोधनाचा विषय आहे.आणि उचलला असेल तर परीक्षा केंद्र का सुरू झाले नाही?  योगेश धुरी, युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ

कुडाळ प्रतिनिधी: तलाठी केंद्र दुसऱ्या टप्प्यात देखील बाहेरच्या जिल्ह्यात दिले गेले खासदार विनायकजी राऊत,आमदार वैभवजी नाईक यांच्या सूचनेनुसार TCS यांनी जिल्ह्यातील केंद्र देण्याची तयारी दर्शविली होती परंतु कोकणचे भाग्यविधाते राणे साहेब यांच्या SSPM या कॉलेज ने तसेच MITM कॉलेज ने परीक्षेच कारण देत परीक्षा केंद्र नाकारले.

राणेंना जिल्ह्यातील तरुणांची किती काळजी आहे? किंवा ते किती काळजी घेतात हे विद्यार्थ्यांना लक्षात आलं असेल, आम्ही खासदार साहेब, आमदार साहेब यांना विनंती केली होती की केंद्र जिल्ह्यात देण्यासाठी प्रयत्न करा. त्यानुसार TCS ने SSPM, MITM या दोन्ही कॉलेजला संपर्क केला दोन्ही कॉलेजने परीक्षेच कारण देत तलाठी परीक्षा केंद्र नाकारली.

राणेंनी मनात आणलं असत तर विद्यार्थ्यांचा त्रास कमी करू शकला असता, परंतु त्यांनी ते केलं नाही. त्यांचं ते वैयक्तिक कॉलेज आहे. त्यांनी त्या कॉलेजमध्ये काय करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.

युवासेनेच्या वतीने खासदार, आमदार यांचे मनापासून आभार, विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी पण लक्षात ठेवा खासदार विनायकजी राऊत साहेब, आमदार वैभवजी नाईक साहेब हेच सर्वसामान्यांचे खासदार,आमदार आहेत. बाकीचे सगळे मतांपूरते आहेत. अशी प्रतिक्रिया युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ योगेश धुरी यांनी दिली आहे.


Spread the love

Related posts

भाजपसोबत जाण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीवर दबाव आणला जात आहे.

news

ईडीची बिडी पेटल्याशिवाय राहत नाही! छगन भुजबळ यांची खोचक टीका…

news

ओरोस येथे खा. विनायक राऊत यांच्या प्रचार कार्यालयाचे दिमाखात उदघाटन.

news

Leave a Comment