स्टोरी

जेष्ठ नागरिकांनी मन नेहमी प्रसन्न ठेवावे! सुरेंद्र सकपाळ यांचे प्रतिपादन

Spread the love



पळसंब जेष्ठ नागरिक सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

मसुरे प्रतिनिधी:

जेष्ठ ग्रामस्थांनी सल्लागाराच्या भूमिकेत रहावे. तब्येत चांगली रहावी यासाठी मन नेहमी प्रसन्न असणे आवश्यक आहे. नैराश्य, चिंता, प्रकृती आणि स्वास्थ्य ,असमाधान या चार सुत्रीचा योग्य उपयोग जर आपण करू शकलो तर या वयात सुध्दा समाधानी जीवन जगु शकतो असे प्रतिपादन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुरेंद्र सकपाळ यांनी पळसंब येथे केले.
पळसंब जेष्ठ नागरिक सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा जयंती देवी मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी आचरा येथील गजानन मेडिकल स्टोअर्स चे मालक विनायक परब यांनी जेष्ठ नागरिक संघासाठी पाच हजार रुपयांची मदत दिली.
उपसरपंच अविराज परब म्हणाले, उज्ज्वल भावी पिढी घडविण्यासाठी जेष्ठांच्या ठाई असलेल्या अनुभवाची शिदोरी नवीन पिढीला द्यावी असे सांगितले. सरपंच श्री महेश वरक यांनी स्वर्गीय भाई चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादा पुजारे, उपाध्यक्ष रतिका गोलतकर, सचिव विश्वनाथ गोलतकर, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, आणि जेष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, सुभाष तर्फे, तुळशीदास चव्हाण, गणेश पुजारे, ज्ञानदेव परब, दिवाकर पुजारे, मारुती परब, मधुकर सावंत, विजय सावंत, पुंडलिक परब, महादेव वाघ, सुरेश पुजारे, मधुकर कदम, शारदा पुजारे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक श्री रमेश परब यांनी सुत्रसंचालन श्री प्रमोद सावंत यांनी केले. यावेळी मंदिर परीसरात रुद्राक्ष, धूप, चंदन आदी औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली.


Spread the love

Related posts

मंडणगड तालुक्यातील भोळवली येथील धरणाच्या भिंतीला गळती! ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण.

news

स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू झालेल्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने स्वातंत्र्यदिनी मुलाच्या वडिलांचा उपोषणाचा इशारा!

news

लग्नाच्या बहाण्याने फसवणूक प्रकरणी संशयितांस अटकपूर्व जामीन मंजूर.!

news

Leave a Comment