शिक्षण

आजगाव विद्या विहार हायस्कूलमध्ये गुणवंतांचा गुणगौरव! मान्यवरांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक….

Spread the love

सावंतवाडी: तालुक्यातील आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूलमध्ये यंदाच्या दहावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. विद्यालयाच्या इयत्ता दहावीचा निकाल 96.15% लागला असून प्रथम क्रमांक काजल सुनील मुळीक 91.60%, द्वितीय क्रमांक वैष्णवी ईश्वर थडके 87.60%, आणि तृतीय क्रमांक विराज अनंत प्रभू साळगावकर 87% यांनी मिळवला. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच इतर यशस्वी विद्यार्थ्यांनाही भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले. यावेळी आजगाव ग्रामपंचायतमार्फत शाळेतील सर्व मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.

कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी केले. यावेळी शाळा समिती अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णा झांट्ये, आजगाव सरपंच यशश्री सौदागर, माजी पंचायत समिती सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या मनिषा गोवेकर, ग्रामसेवक श्री. गवस, ग्रामपंचायत सदस्य राकेश सावंत, वर्षा रेवाडकर शलाका वाडकर, वैष्णवी आजगावकर तसेच अध्यापक विद्यालयाचे प्रा. गणेश तुंगार, प्रा. भरमण्णा वाणी, ग्रामस्थ चंदू पांढरे, दीपक गावडे, तसेच अन्य पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका मानसी परुळेकर यांनी केले तर शकाव्या साळवी यांनी आभार मानले.


Spread the love

Related posts

कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री विशाल प्रभाकर परब यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप 

news

परब मराठा समाज मुंबई पालघर च्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन.

news

विलवडे नं. २ शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरेश काळे यांचे M.A.Ed परीक्षेत सुयश. 

news

Leave a Comment