शिक्षण

कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतले बांधावरची शिवार शाळा उपक्रमांतर्गत भातरोपणीचा अनुभव.

Spread the love

सावंतवाडी: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय,सावंतवाडी. प्रशालेच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रम अंतर्गत असलेल्या बांधावरची शिवार शाळा-२०२६ या उपक्रमात प्रत्यक्ष भातरोपणीचा अनुभव घेतला. यावेळी मळगाव येथील सौ व श्री दीपक मेस्त्री यांच्या शिवार शेतीत विद्यार्थ्यांनी भाताचे रोप काढणे व भाताचे रोप लावणे याचे प्रात्यक्षिक अभ्यासले. यावा यावेळी सौ व श्री दीपक मेस्त्री यांनी विद्यार्थ्यांना शेतीविषयक व भात रोपणी विषयक प्रात्यक्षिकसह मार्गदर्शन केले.

या उपक्रमामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस.व्ही.भुरे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत, शिवार प्रमुख सौ व श्री दीपक मेस्त्री,प्रशालेचे शिक्षक श्रीमती एस.यु.बांदेलकर, श्री अनिल ठाकूर श्री पी.बी.बागुल स्थानिक अंगणवाडी सेविका श्रीमती खडपकर मॅडम, श्रीमती राणे मॅडम, तसेच पालक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतले. यावेळी प्रशालेचे शिक्षक श्री अनिल ठाकूर यांनी शेतशिवार उपलब्ध करून दिल्याबद्दल सौ.व श्री दीपक मेस्त्री यांचे प्रशालेच्या वतीने आभार मानले.


Spread the love

Related posts

प्राथमिक शिक्षक संघाचे कार्य कौतुकास्पद.

news

मसुरे एज्युकेशन सोसायटी चे शैक्षणिक क्षेत्रात मोठे नाव आहे! डॉक्टर दीपक मुळीक….

news

भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण व युवानेते विशाल परब यांच्या माध्यमातून कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.

प्रसाद परब

Leave a Comment