स्टोरी

इम्रान खान यांच्या लाहोर येथील घराला पोलिसांचा घेराव

Spread the love

पाकिस्तान (वार्ता): पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या लाहोर येथील घराला पोलिसांनी घेराव घातला आहे. इम्रान खानच्या घरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्याचा पोलिसांचा दावा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाहोरच्या जमान पार्कमध्ये इम्रान खान यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस जमा झाले आहेत. इम्रान यांच्या घरात 40 दहशतवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांच्या घराला पोलिसांनी घेराव घातल्याची माहिती मिळताच इम्रान यांचे समर्थकही त्याच्या घराबाहेर मोठ्या संख्येने जमा होऊ लागले आहेत. इम्रान यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आणि त्याचे समर्थक जमल्याने हाणामारी होण्याची शक्यताही बळावली जात आहे.दरम्यान, इम्रान खान यांना पाकिस्तान रेंजर्सने 9 मे रोजी न्यायालयाच्या परिसरातून अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर त्यांची सुटका करण्यात आली. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने 9 मेनंतर इम्रान खान यांच्या विरोधात नोंदवलेल्या कोणत्याही प्रकरणात अटक करण्यावर बंदी घालण्याचा आदेश बुधवार ३१ मे पर्यंत वाढवला आहे.


Spread the love

Related posts

माणगांव वाचनालयाचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न!

news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे श्री स्वामी समर्थ चरणी नतमस्तक! 

news

भानुदास चिंदरकर यांचे निधन!

news

Leave a Comment