स्टोरी

इस्रो’च्या पुढील मोहीम ‘गगनयान’द्वारे अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार !

Spread the love

जानेवारी ते मार्च २०२४ मध्ये कार्यान्वित करणार!

२५ ऑगस्ट वार्ता: ‘मंगळयान’ आणि ‘चंद्रयान-३’ या मोहिमांच्या नेत्रदीपक यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या ‘गगनयान’ मोहिमेकडे आता भारतवासियांचे लक्ष लागले आहे. भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवून अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये भारताचे स्थान अधिक बळकट करणारी ही ‘इस्रो’ची महत्त्वाकांक्षी मोहीम असणार आहे.जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीत ही मोहीम कार्यान्वित करण्यात येईल. कोरोना महामारीमुळे या मोहिमेला फटका बसला, अन्यथा आतापर्यंत ही मोहीम भारताने यशस्वी करून दाखवली असती, असे सांगण्यात येत आहे. वर्ष २०१८ मध्येच पंतप्रधानांनी या मोहिमेची घोषणा केली होती. या मोहिमेसाठी एकूण ९ सहस्र २३ कोटी रुपये खर्च येईल, असे सांगण्यात येत आहे.

१. अमेरिका, तत्कालीन सोव्हिएत महासंघ आणि चीन या तीन देशांनी आतापर्यंत अवकाशात मानव पाठवला आहे. यानंतर आता प्रथमच ‘इस्रो’ने ही मोहीम आखली आहे.

 

२. यामध्ये पृथ्वीभोवती ४०० किलोमीटरच्या कक्षेमध्ये तीन अंतराळवीरांना तीन दिवसांसाठी पाठवण्यात येणार आहे. तेथील प्रयोगांनंतर त्यांना भारतीय समुद्रामध्ये सुरक्षित उतरविण्याचा ‘इस्रो’चा प्रयत्न असेल.


Spread the love

Related posts

आपली प्राथमिक मराठी शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न करूया “शिकलो ती शाळा स्वच्छ व सुंदर बनवण्याचे भाग्य लाभले..! रवी जाधव. 

news

बाणेर-बालेवाडी 24×7 पाणी पुरवठा योजनेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

news

पुण्‍यातील ससून रुग्‍णालयाच्‍या प्रवेशद्वारावर २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्‍त !

news

Leave a Comment