क्राईम

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात २ सहस्र ८९० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात ८८ लाख रुपयांची रोख रक्कम, मद्य, रसायन, गांजा असा ४ कोटी ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याचसमवेत ११ पिस्तुल-गावठी कट्टे जप्त करण्यात आले.कोल्हापूर परिक्षेत्रात २ सहस्र ८९० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकारांना दिली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या प्रमाणात होणारी कारवाई ही भारताच्या अमृत महोत्सवी लोकशाहीसाठी लज्जास्पद नाही का?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागांत विविध ठिकाणी पोलिसांचे पडताळणी नाके उभे करण्यात आले होते. त्यानुसार सीमवर्ती भागात मोठी कारवाई करण्यास पोलिसांना यश आले आहे. सोलापूर ग्रामीणच्या भागात ८८ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. २० लाख ३० सहस्र रुपयांचे मद्य, गुटख्याची २ लाख ३३ सहस्र पाकिटे जप्त करण्यात आली, तर ३ कोटी २५ लाख रुपयांचा मद्य बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त करण्यात आला, असे फुलारी यांनी सांगितले.


Spread the love

Related posts

हुती दहशतवाद्यांकडून भारताच्या मालवाहू जहाजाचे अपहरण….

news

दिपक केसरकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रदीप भालेकर याच्यावर मलबार पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल!

news

पोलिसांवर आक्रमण करणार्‍या टोळक्‍यास १६ वर्षांनंतर शिक्षा !

news

Leave a Comment