राजकारण

पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत अध्यक्षपदी रहाणार! राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सुप्रिया सुळे यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याचा विचार आताच करता येणार नाही. पक्ष आणि कार्यकर्ते यांच्यासाठी मी निवृत्ती मागे घेतली. पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत मीच अध्यक्षपदी रहाणार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. शरद पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचे लिखाण दैनिक ‘सामना’मध्ये करण्यात आले आहे. याचा संदर्भ देत पत्रकारांनी ८ मे या दिवशी शरद पवार यांना विचारणा केली असता त्यांनी वरील वक्तव्य केले. ‘मी पक्षाचा वारसदार निर्माण करू शकलो नाही, हे त्यांचे मत आहे’, असेही या वेळी शरद पवार म्हणाले.


Spread the love

Related posts

पुणे तिथे काय उणे, उमेदवाराची ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ स्टाईल, नुसती चिल्लरच चिल्लर

news

राष्ट्रवादीतील फूटीनंतर काही महिला पदाधिका-यांची महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी पक्षातून केली हकालपट्टी!

news

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात जाणार?….विखे-पाटील यांची ऑफर

news

Leave a Comment