स्टोरी

कुख्यात गुंड मुख्तार अंसारी याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: वर्ष २००५ मध्ये भाजपचे तत्कालीन आमदार कृष्णानंद राय यांच्यासह ७ जणांची हत्या केल्याच्या प्रकरणी कुख्यात गुंड मुख्तार अंसारी याला न्यायालयाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. त्याला ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या सुनावणीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुख्तार अंसारी हा बांदा कारागृहातून ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे उपस्थित होता.

मुख्तार अंसारी हा बहुजन समाजवादी पक्षाचा माजी आमदार आहे. यासह त्याचा भाऊ खासदार अफझल अंसारी हा बहुजन समाजवादी पक्षाचा गाझीपूरचा विद्यमान खासदार आहे. कृष्णानंद राय यांच्यासह ७ जणांवर ‘एके-४७’ रायफलीतून तब्बल ४०० गोळ्या झाडून त्या सर्वांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अंसारीसह त्याच्या टोळीविरुद्ध ‘गँगस्टर’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती.


Spread the love

Related posts

कणकवलीत विवेकानंद नेत्रालयाच्या कार्यालयात आमदार वैभव नाईक यांची धडक…!

news

रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघात ११ वाजेपर्यंत २१.१९%  मतदान

news

राष्ट्रीय महामार्ग विभाग बांदा महामार्गा वरील अतिक्रमण २१ व २२ मार्च ला काढणार

news

Leave a Comment