स्टोरी

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारिंवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली!

Spread the love

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात अनेक राजकीय आणि वादग्रस्त घडामोडी घडल्या. तुम्हाला कोणी विचारले की तुमचा आदर्श कोण, तर बाहेर बघायची गरज नाही. इथे महाराष्ट्रात अनेक आहेत. शिवाजी जुन्या काळातील आहेत. मी नव्या युगाबद्दल बोलतोय’, असे वक्तव्य कोश्यारी यांनी केले होते. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेली विधाने ही इतिहासाचे विश्लेषण करणारी होती, असे निरीक्षण नोंदवित छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांच्याविषयी केलेल्या व्यक्तव्यांबाबत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. कोश्यारींच्या विधानांचा सखोल विचार केल्यास हेतू स्पष्ट होतो. सध्याच्या काळात आपण इतिहासातून शिकले पाहिजे, असे न्या. सुनील शुक्रे व न्या. अभय वाघवासे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. थोर व्यक्तींचा अनादर करणारी विधाने म्हणून याकडे पाहिले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.


Spread the love

Related posts

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने वस्त्रहरणकार कै. गंगाराम गवाणकर यांना वाहिली श्रद्धांजली

news

व्यावसायिक एलपीजी वाटपासाठी PNG (Piped Natural Gas) जोडणी आवश्यक; सिंधुदुर्गातील ग्राहकांना अर्ज करण्याचे आवाहन.

प्रसाद परब

माझ्या आजोळी गावच्या मातीत पंचक्रोशीत जो सत्कार झाला तो खरोखरच माझ्या दृष्टीने भाग्याचा आहे…! दिगंबर नाईक

news

Leave a Comment