शिक्षण

कौशल्य प्रशिक्षणातून रोजगाराच्या नव्या संधी; कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये प्लंबिंग टेक्नॉलॉजी कार्यशाळेचे उद्घाटन.

Spread the love

सावंतवाडी: पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करून युवकांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारावा आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण कराव्यात, या उद्देशाने सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी आणि ज्ञानदा गुरुकुल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्लंबिंग टेक्नॉलॉजी कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमाला सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. शैलेश पई, सहसचिव श्री. गौरांग चिटणीस, माजी विद्यार्थी श्री. दत्तप्रसाद गोठोस्कर व श्री. नीरज देसाई, कळसुलकर इंग्लिश स्कूलचे प्राचार्य श्री. सूर्यकांत भुरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख श्री. यू. आर. पाटील, ज्ञानदा गुरुकुलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. अभय थिटे, टेक्निशियन ट्रेनर श्री. धनंजय डोंबळे आणि कोकण प्रांताचे मोबिलायझेशन ऑफिसर श्री. अमित नाईक उपस्थित होते*. मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य श्री. सूर्यकांत भुरे यांनी कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व विशद केले. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवीपेक्षा प्रत्यक्ष कामाचे कौशल्य, तांत्रिक ज्ञान आणि कामातील अचूकता यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी या प्रशिक्षणात सहभागी होऊन रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यानंतर ज्ञानदा गुरुकुलचे CEO श्री. अभय थिटे यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. प्लंबिंग टेक्नॉलॉजी कौशल्य प्रशिक्षणाचे स्वरूप, प्रशिक्षणाचा कालावधी, रोजगाराच्या उपलब्ध संधी आणि या क्षेत्रातून उत्पन्न मिळविण्याच्या शक्यता यांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. योग्य प्रशिक्षण आणि कौशल्याच्या बळावर युवक स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनू शकतात. प्लंबिंग हे केवळ नळ दुरुस्तीपुरते मर्यादित नसून आधुनिक बांधकाम क्षेत्राशी निगडित एक महत्त्वाचे तांत्रिक कौशल्य आहे. त्यामुळे अधिकाधिक युवकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. शैलेश पई यांनी प्लंबरच्या कामाचे व्यापक महत्त्व अधोरेखित केले. “प्लंबर म्हणजे केवळ नळ दुरुस्त करणारा कारागीर नव्हे; तर पाण्याच्या वाहिन्यांचे योग्य नियोजन, अचूक मोजमाप, सुरक्षित पाणीपुरवठा आणि दैनंदिन जीवनातील पाण्यासंबंधी समस्या सोडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा कुशल तंत्रज्ञ होय,” असे त्यांनी स्पष्ट केले. या क्षेत्रात तांत्रिक कौशल्य प्राप्त केल्यास रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे युवकांनी अशा प्रशिक्षणाकडे केवळ अभ्यासक्रम म्हणून न पाहता स्वतःचे भविष्य घडविण्याची संधी म्हणून पाहावे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबत व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. कौशल्य, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर युवकांना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. प्रसाद कोलगावकर यांनी केले. या कार्यक्रमाला इयत्ता अकरावी व बारावीचे विद्यार्थी तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते


Spread the love

Related posts

सावंतवाडी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न.

news

चिन्मय फोंडबा चित्रकला स्पर्धेत प्रथम!

news

विभव राऊळ हा शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात तृतीय.

news

Leave a Comment