सावंतवाडी (रवी जाधव): सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील (I.C.U.) व्हेंटिलेटरवर आहे. या विभागातील ए.सी.यंत्रणा गेले दोन महिने बंद असूनही रुग्णालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली नसल्याने आता रुग्णांना घेऊन उपोषणास बसावे लागेल, असा इशारा सामाजिक कायेँकतेँ रवी जाधव यांनी दिला आहे.आय.सी.यु.विभागाची ही दयनीय अवस्था का झाली? याला जबाबदार कोण, याची सखोल चौकशी व्हावी. आणि रुग्णांच्या या हाल अपेष्ठेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठापनचे रवी जाधव यांनी केली आहे.यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, वैद्यकीय अधिक्षक सावंतवाडी यांना प्रसंगी उपोषणाची नोटीस देणार असल्याचे श्री.जाधव यांनी पत्रकात नमूद केले आहे. आय.सी.यु. विभागातील विभागातील रुग्णांचे हाल तातडीने थांबावेत.कंपनीला दहा लाखाचे बिल अदा न केल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सातत्याने व गंभीरपणे रुग्णांची काळजी घेणारे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हॉस्पिटल मधील नव्या आयसीयू विभागातील गेले दोन महिन्यापासून एसी पूर्णपणे बंद आहे सदर आयसीयू पूर्णपणे बंदिस्त असल्याकारणाने रुग्ण अक्षरशा त्यामध्ये गुदमरत असल्याची परिस्थिती समोर आली आहे. मागे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने उपलब्ध करून दिलेले स्टॅंडिंग फॅनचा आधार घेऊन आहेत. त्याचप्रमाणे लाखो रुपये खर्च करून रुग्णांसाठी तयार केलेली लिफ्ट उद्घाटन होऊन सुद्धा रुग्णांच्या सेवेत अद्यापही कार्यरत नाही.
तसेच अजूनही रुग्णांचे बांबूळीला रेफर करण्याचे प्रमाण कमी झालेले दिसत नाही. प्रत्येक जण येऊन येथे आश्वासन देऊन जातो परंतु प्रत्यक्षात येथे सामाजिक कार्यकर्तेच वावरताना दिसतात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाने संस्था व दात्यांच्या माध्यमातून आजपर्यंत रुग्णांच्या सेवेसाठी दोन लाखाच्या बाहेर रुग्णपयोगी वस्तूला दिले. हॉस्पिटल मधील संडास बाथरूम ओव्हर फ्लो झाले होते तर ड्रेनेज मधून पाणी रस्त्यावर येत होते रुग्णांचे प्रचंड हाल झाले होते अशावेळी हॉस्पिटल मधील ड्रेनेजच्या टाक्या देखील संस्थेच्या रूपा मुद्राळे हिने स्वखर्चाने साफ करून घेतल्या होत्या तर आठ दिवसापूर्वीच आरोग्य सभापती सुधीर आरीवडेकर व नगर परिषदेच्या सहकार्यातून संपूर्ण हॉस्पिटल परिसराची साफसफाई करून घेतली. तसे रुग्णांसाठी लागणाऱ्या अनेक सोयीसुविधांवर देखील या संस्थेचा बारीक लक्ष असतो. उष्णता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ( I. C. U ) तसेच इतर विभागामधील सर्व ए.सी बंद आहेत त्यामुळे रुग्णांचे होत असलेले हाल पहावत नाही. सदर विषयासंदर्भात सोमवार दिनांक 19/ 10/ 2026 रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक यांना निवेदन सादर करणार आहोत. जर येत्या आठ दिवसात सर्व विभागातील रुग्णांना सोयी सुविधा तसेच ए.सी सुरू न झाल्यास सदर रुग्णांना घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी दिला आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे विशेष कार्य अधिकारी डा.सांगळे यांनी भेट दिली. तेव्हा रुग्ण कल्याण समिती सदस्य म्हणून पूर्व कल्पना देणे आवश्यक होते. मात्र तशी कोणतीही कल्पना न देता राजकीय स्वरूपात दौरा करणे योग्य नाही. यासंदर्भात काम करणाऱ्या संस्था, संघटनांनाही कळविण्यात आले नाही. रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भात कळवणे आवश्यक होते.
