स्टोरी

राष्ट्रीय महामार्ग क्र. ७६ वरील पुलांवरील खड्ड्यांचा धोका; वांगणी मनसे कडून तात्काळ दुरुस्तीची मागणी.

Spread the love

वांगणी प्रतिनिधी (जयेश कवणे): राष्ट्रीय महामार्ग क्र. ७६ वरील चामटोली गावातील पुलासह जोविली–तलपाडा येथील दोन्ही पुलांच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या खड्ड्यांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हे खड्डे स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठिकाणांची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून पुलांवरील व पुलांच्या दोन्ही बाजूंच्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष कु. जयेश नंदू केवणे यांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग क्र. ७६ वरील विविध रस्ते व पुलांच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाकडे मागण्या व तक्रारी करण्यात येत असल्याचे केवणे यांनी सांगितले. गोरगाव–ढवळेपाडा मार्गाच्या कामानंतरही काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे संबंधित कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

केवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेल्या निवेदनात चामटोली ब्रिज, जोविली–तलपाडा येथील पूल तसेच ढवळेपाडा–ढवळगाव–वांगणी परिसरातील पुलांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.तसेच, करण्यात आलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांची गुणवत्ता तपासणी करून निकृष्ट काम आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.“राष्ट्रीय महामार्ग क्र. ७६ हा बदलापूर–वांगणी परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. पुलांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने विलंब न करता पाहणी करून दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत,” अशी मागणी मनविसेचे विभाग अध्यक्ष जयेश केवणे यांनी केली. या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे क्रमांक २ तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहे.— कु. जयेश नंदू केवणे मनविसे विभाग अध्यक्ष, वांगणी


Spread the love

Related posts

मोती तलावात एक अज्ञात तरुण चिखलात बुडाला!

news

रेशन दुकानांतून वितरित करण्यात येणारा तांदूळ खाण्यायोग्य आहे! अमोल पाठक, तहसीलदार, कुडाळ

news

जागतिक पर्यटन दिन किल्ले सिंधुदुर्ग येथे उत्साहात साजरा

news

Leave a Comment