सावंतवाडी प्रतिनिधी: मा. हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, सावंतवाडी येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत जन आरोग्य समितीची सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी सर्वांचे स्वागत करून अध्यक्षांच्या परवानगीने सभा कामकाजास सुरुवात झाली. सचिव डॉ. हर्ष सागावकार यांनी सेवा संकल्प अभियान विषयी माहिती दिली. त्यानुसार अध्यक्ष व सदस्य यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर, अवयवदान संकल्प व नोंदणी, तिशीचा पल्ला नुसार तपासणी व सल्ला, तसेच आवश्यक रक्त तपासणी व उपचार करण्यात येतील, असे ठरले.आगामी आठवड्यात विविध आरोग्य शिबिरे नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांच्या सहकार्याने वॉर्डा-वॉर्डात घेण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन समितीच्या अध्यक्ष *श्रीम. सुकन्या प्रवीण टोपले* यांनी केले आहे.यावेळी *डॉ. हर्ष सागावकार, आरोग्य सहाय्यक शंकर परब, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर व सीताराम बांदेकर, प्रकाश मसुरकर, गणेश बोर्डेकर, प्रवीण मोरजकर, वासंती परुळेकर, अनुजा साळगावकर, शुभांगी देऊळकर, तृप्ती अंधारी, गायत्री वारंग, गंगा सुतार, यशवंत परब* आदी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
