वेंगुर्ला: वेंगुर्ला येथे शिवसेना शिंदे गटाशी संबंधित पंचायत समिती सभापती सिद्धेश परब यांच्या निवासस्थानी अमली पदार्थ आढळल्याच्या वृत्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गंभीर चिंता निर्माण झाली आहे.सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते—या प्रकरणाकडे आम्ही राजकीय सूडबुद्धीने पाहत नाही. अमली पदार्थांचा प्रश्न हा पक्षीय राजकारणापेक्षा कितीतरी मोठा आहे. हा आपल्या तरुण पिढीच्या भवितव्याचा, आपल्या कुटुंबांचा आणि सिंधुदुर्गच्या पर्यटनाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक चौकशी झालीच पाहिजे.सिद्धेश परब यांचे नाव यापूर्वी जुगार, मटका आदी कथित अवैध प्रकारांच्या चर्चेत आल्याचे तसेच काही छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचे समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर सध्याच्या प्रकरणातील प्रत्येक बाब तपास यंत्रणांनी गांभीर्याने तपासली पाहिजे. मात्र, सोशल मीडियावरील आरोपांना अंतिम सत्य न मानता, पुराव्यांच्या आधारेच कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.पालकमंत्र्यांनी ड्रग्ज आणि अमली पदार्थां तसेच मटका जुगार यासंदर्भात असलेले लोकप्रतिनिधी किंवा सतेतले तसेच अन्य कोणीही अजूनही आहेत यांचा शोध घ्यावा आणी त्यांच्या विरोधात कठोर भूमिका घ्यावी तर आम्ही त्याचे स्वागत करू सिंधुदुर्ग च्या पालकमंत्र्यानि नितेश राणे अवैध्य धंद्या विरोधातली भूमिका कौतुकास्पद.—कायद्याची कठोरता ही पक्ष पाहून बदलणार आहे का?भाजप असो, काँग्रेस असो, शिवसेना असो किंवा कोणताही पक्ष—कायद्यापुढे सर्व समान असले पाहिजेत.जर तपासात संबंधित व्यक्ती दोषी आढळली, तर ती व्यक्ती कितीही मोठ्या राजकीय पदावर असो, तिला कायद्यानुसार कठोर कारवाईला सामोरे जावेच लागले पाहिजे.आमची मागणी स्पष्ट आहे—या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करावी.कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तपास करावा.अमली पदार्थांचा स्रोत, पुरवठा साखळी आणि या प्रकरणाशी संबंधित सर्व व्यक्तींची चौकशी करावी.तपासात दोषी आढळणाऱ्या प्रत्येकावर, पद आणि राजकीय ओळख न पाहता, कठोर कायदेशीर कारवाई करावी.नैतिक जबाबदारीच्या दृष्टीने संबंधित पदाधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.त्यांच्या पत्नीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यत्वाबाबतही संबंधित पक्षाच्या नेतृत्वाने नैतिकतेच्या दृष्टीने राजीनामा द्यावा भावी पिढी पेक्षा राजकारण मोठे नाही. दहशत वाद बोलणारे आमदार आता ह्यांचा राजीनामा घेतील का??सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. आपल्या जिल्ह्याची ओळख ड्रग्ज, मटका आणि अवैध धंद्यांमुळे होऊ नये. आपल्या तरुणांच्या हातात रोजगार, शिक्षण आणि संधी असायला हव्यात; अमली पदार्थ नाहीत.आज एखादा पदाधिकारी असल्यामुळे कारवाई थांबवली, तर उद्या त्याचा संदेश संपूर्ण जिल्ह्यात चुकीचा जाईल.म्हणून सिंधुदुर्ग पोलिसांना आमचे आवाहन आहे—दबावाला झुकू नका, राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नका आणि सत्याच्या मुळापर्यंत जा.दोषी कोणताही असो—सत्तेतला असो किंवा विरोधकांमधला असो—कायद्याची गय करू नका!ड्रग्जमुक्त सिंधुदुर्गासाठी काँग्रेसचा लढा कायम सुरू राहील.— सौ. साक्षी वंजारीजिल्हाध्यक्ष, काँग्रेस, सिंधुदुर्ग
