स्टोरी

मुंबई उच्च न्यायालयाच्या विवाह समुपदेशक परीक्षेत सिंधुदुर्गचा लौकिक..! नंदकिशोर फोंडेकर आणि ऍड. रोहन शारबिद्रे यांचे यश

Spread the love

कुडाळ: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत कौटुंबिक न्यायालयाच्या “विवाह समुपदेशक” (राजपत्रित अधिकारी गट-अ) या पदाच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. फोंडाघाट गावचे सुपुत्र नंदकिशोर रामदास फोंडेकर यांनी महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक, तर कुडाळ तालुक्यातील सुपुत्र ऍड. रोहन सदानंद शारबिद्रे यांनी बारावा क्रमांक पटकावत घवघवीत यश मिळविले आहे.
सदरची पदभरती प्रक्रिया ही मुंबई उच्च न्यायालयामार्फत राबविण्यात आली होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://www.facebook.com/Sindhudurgtoday.in

आवाज सिंधुदुर्गच्या व्हाट्सअँप ग्रुपमध्ये सामिल होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇

https://chat.whatsapp.com/GdhgbJckiutKmymoBDNr5C

Spread the love

Related posts

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे दोषमुक्त.

news

ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्गने केला रक्तदात्यांचा यथोचित सन्मान.

प्रसाद परब

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे अध्ययन -अध्यापन साहित्य दिवस साजरा!

news

Leave a Comment