स्टोरी

सावंतवाडीत नारी अभ्युदय महोत्सव उत्साहात.

Spread the love

सावंतवाडी: “इमान इथल्या मातीशी, माणुसकीच्या नात्याशी” हे ब्रीदवाक्य जपत सामाजिक कार्य करणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान तुळस संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी येथील जगन्नाथ भोसले उद्यान येथे नारी अभय महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या महोत्सवात सामाजिक, कला, आरोग्य, शिक्षण तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास नवनिर्वाचित नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिका ताई परब यांच्या हस्ते राजे प्रतिष्ठान चित्रपट सेना, महाराष्ट्र – सिंधुदुर्ग जिल्हा संघटना सावंतवाडी यांच्या शहर प्रमुख सौ. मनाली राऊत, सल्लागार रुचिता आईर तसेच हेमांगी माने आणि सुरेखा पवार यांचा सन्मान करण्यात आला.राजे प्रतिष्ठान चित्रपट सेना यांच्या वतीने वेताळ प्रतिष्ठान तुळस संस्था आणि सौ. वेदिका ताई परब यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


Spread the love

Related posts

मनसे अध्यक्ष राज ठाकरे श्री स्वामी समर्थ चरणी नतमस्तक! 

news

क्रिकेट सामन्यांचे बंदोबस्त शुल्क वाढवून त्यातून पोलिसांची घरे दुरुस्त करावीत ! हिंदू विधिज्ञ परिषदेची मागणी

news

जिल्हाधिकारी यांनी शेती सव्रक्षण प्रलंबित परवाने तरी द्यावेत किंवा अंबा बागेमध्ये एक फॉरेस्ट ऑफिसर बसवावा…!

news

Leave a Comment