शिक्षण

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री. बी.टी.राठोड यांचा शिक्षक प्रतिकृतिमध्ये सावंतवाडी तालुक्यातुन तृतीय क्रमांक.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती सावंतवाडी आयोजित संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे संपन्न झालेल्या ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनिये प्रशालेचे जेष्ठ विज्ञान शिक्षक श्री. बी.टी.राठोड सर यांचा शिक्षक प्रतिकृति मध्ये सावंतवाडी तालुक्यातुन तृतीय क्रमांक आला.

या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रशालेतुन विद्यार्थी प्रतिकृति मध्ये इयत्ता १०वीचा विद्यार्थी कु. गोविंद सावंत याने ‘ नैसर्गिक जलव्यवस्थापन ‘ या विषयावर तर शिक्षक प्रतिकृती मध्ये श्री. राठोड सर यांनी ‘मनोरंजनातुन विज्ञान या विषयावर प्रतिकृती (माॅडेल) निर्मिती केली.

धबांदा नवभारत शिक्षण मंडळ मुंबईच्या अध्यक्षा-श्रीम.कल्पनाताई तोरसकर,कार्याध्यक्ष- मा.डॉ.श्री. मिलिंद तोरसकर, सचिव-मा.श्री.संतोष सावंत, कोषाध्यक्ष-मा.श्री.वैभव नाईक, समन्वय समिती सचिव मा.सौ.रश्मी तोरसकर, प्राचार्य तथा समन्वय समिती सहसचिव मा.श्री.नंदकुमार नाईक,प्रशालेचे संस्थापक श्री. एम.डी. सावंत सर सर्व संस्था प्रतिनिधी,शालेय समिती सदस्य,पालक,मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्री.राठोड सरांचे अभिनंदन केले .


Spread the love

Related posts

कळसुलकर प्राथमिक शाळेच्या मुलांचे नरेंद्र डोंगर येथे वृक्षारोपण.

news

संदिप गावडे फाउंडेशनच्या वतीने चौथीसाठी यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा २०२५ चे आयोजन.

news

प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मराठी विश्वकोश नोंद लेखन कार्यशाळेचे आयोजन.

newss

Leave a Comment