शिक्षण

कु. स्पृहा आरोंदेकर हिला युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) सन २०२५ परीक्षेत घवघवीत यश प्राप्त.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) सन २०२५ परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलची विद्यार्थिनी ‘ कु. स्पृहा अमेय आरोंदेकर ‘ हिने घवघवीत यश प्राप्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांपैकी पहिल्या ५० विद्यार्थ्यांमध्ये ‘ कु. स्पृहा अमेय आरोंदेकर ‘ हिने सुवर्णपदक पटकावले. तसेच मान्यवरांच्या हस्ते तिला प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. हा बक्षीस वितरण सोहळा दिनांक २७ जुलै २०२५ रोजी भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे पार पडला. प्रशालेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी देखील या विद्यार्थीनीचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.


Spread the love

Related posts

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री. बी.टी.राठोड यांचा शिक्षक प्रतिकृतिमध्ये सावंतवाडी तालुक्यातुन तृतीय क्रमांक.

news

तर ग्रामीण भागातील शाळा कायमस्वरूपी बंद पडतील..! माजी सभापती उदय परब

news

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीचा २० वा वर्धापन दिन २१ आणि २२ रोजी होणार…!

news

Leave a Comment