स्टोरी

जय जय रघुवीर समर्थ! आजच्या दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी!श्लोक क्रमांक ७ आणि अर्थ

Spread the love

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे,

मना बोलणे नीच सोशीत जावे,

स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे,

मना सर्व लोकांसि रे नीववावे ||७||

अर्थ: हे मना, तुझ्याकडे नेहमी धाडस, धैर्य असायला हवे आणि कोणी दूषणे दिली असल्यास ती सोसायची ताकत असायला हवी. आपण नेहमी नम्र भाषेत बोलावे आणि तसे बोलून लोकांचे समाधान करावे.या श्लोकात समर्थ समजावताहेत की हे मानवा, श्री रामाचा आनंत मार्ग अनुसरायचा असेल तर मनात सर्वप्रथम असीम धैर्य असणे आवश्यक आहे. संसारात वेगवेगळ्या प्रसंगाना धाडसाने तोंड देतो तसेच धाडस, म्हणजेच धैर्य हे परमार्थाच्या मार्गाने जाण्यामध्येदेखील काही अडचणी आल्या तर त्यांना तोंड देण्यासाठी, त्यांचे निराकरण करण्यासाठी मनामध्ये असले पाहिजे. अन्यथा हा कठीण मार्ग क्रमणे तुला शक्य होणार नाही. या परमार्थसाधनेच्या मार्गात कोणी चेष्टा केली, अयोग्य शब्दांनी तुझा पाणउतारा केला तरी तू ते सहन करून त्याच्याकडे डोळेझाक केली पाहिजे, सोशिकपणा दाखवला पाहिजे आणि स्वत: अतिशय नम्रपणाचे वर्तन ठेवले पाहिजे. धैर्यपूर्ण, सहनशील आणि नम्र वागण्याने तू समस्त लोकांना आपलेसे करून घ्यायला पाहिजे.


Spread the love

Related posts

सावंतवाडीतील ५६ कोटी रुपयांच्या २४तास पाणीपुरवठा योजनेची स्वतंत्र गुणवत्ता तपासणी करण्याची मागणी !

प्रसाद परब

दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ५ आणि अर्थ.

news

प्रसिद्ध भजनी बुवा कोकण संगीत रत्न वीशाल मसुरकर यांचा मसुरेत हृदय सत्कार

news

Leave a Comment