स्टोरी

घे भरारी फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिना निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडीतील घे भरारी फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिना निमित्ताने शुक्रवारी ७ मार्च रोजी सावंतवाडीतील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे सायंकाळी पाच वाजता खेळ पैठणीचा आणि इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खेळ पैठणी स्पर्धेत प्रथम पारितोषिक पैठणी साडी, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाला आकर्षक साडी, तसेच फनी गेम आधी कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष मोहिनी मडगावकर व अध्यक्ष गीता सावंत, सचिव मेघना राऊळ, उपाध्यक्ष शारदा गुरव, खजिनदार मेघना साळगावकर, कार्याध्यक्ष रिया रेड्डीज आदींनी केले आहे.


Spread the love

Related posts

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे येत्या १६ नोव्हेंबर भारतात आणणार! सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

news

जुनी पेन्शन योजना १०० टक्के देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन…..

news

जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करून कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गने साजरा केला जागतिक महिला दिन.

प्रसाद परब

Leave a Comment