स्टोरी

सावंतवाडी येथे शिवसेना महिला आघाडीचा मेळावा उत्साहात संपन्न.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: गावागावातील प्रत्येक महिलांच्या हातात दीड हजार रुपये दर महिन्याला मिळायलाच हवेत आणि हे दीड हजार रुपये आता मिळायला ही लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ज्या महिलांना अद्याप लाभ मिळाला नाही, अशा महिलांचा शोध घ्या आणि त्यांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. माझी लाडकी बहीण योजना ही प्रत्येकाच्या घराघरात पोहोचायलाच हवी. माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे  अंमलबजावणी झाल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या माध्यमातून महिलांचा सन्मान केला आहे. असे शिवसेनेच्या महिला उपनेत्या मीनाताई कांबळी यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी येथे शिवसेना महिला आघाडीचा मेळावा रवींद्र मंगल कार्यालयत आयोजित करण्यात आला होता. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देणाऱ्या ५० महिला यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या महिला नेत्यातृष्णा विश्वासराव, जिल्हाप्रमुख अँड. निता सावंत, कविटकर, लोबो, अर्चना पांगम,  उत्कर्षा गावकर, सोनाली परब, यशश्री सौदागर, चेतना गडेकर,  दिशा शेटकर, श्रध्दा बावीस्कर, भारती मोरे, शीतल हरमलकर, चैञाली गावडे, निकीता परब, सपना नाटेकर, सुवर्णा नाईक, शर्वरी धारगळकर,  महीला आघाङीतील पदाधिकाऱ्यांसह जिल्हाप्रमुख अशोक दळवी, नारायण राणे, नितिन मांजरेकर,  गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर, प्रचिती कुबल, तारामती सावंत आधी उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक महिला जिल्हाप्रमुख एडवोकेट नीता सावंत, यांनी केले. यावेळी त्या म्हणाल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक घराघरात मिळून दिला जात आहे. आता प्रत्येक भागात आम्ही जाऊन ज्याला लाभ मिळाला नाही त्याला लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील.असे स्पष्ट केले.


Spread the love

Related posts

शासन शिवरायांच्‍या युद्धकलेचे संग्रहालय उभारणार! पर्यटनमंत्री, मंगलप्रभात लोढा

news

मुणगे येथील रस्त्यावर मिठबाव येथील युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेत आढळला मृतदेह!

news

आवळदेवाडी मसदे येथे १२ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन.

प्रसाद परब

Leave a Comment