स्टोरी

शेतकरी विरोधी राज्य सरकारचा महाविकास आघाडीच्या नेते,आमदारांनी केला निषेध…!

Spread the love

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर केले आंदोलन….

 

आमदार वैभव नाईक आंदोलनात झाले सहभागी…

 

 सिंधुदुर्ग: वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेत पिकाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शेत मालाला हमीभाव मिळत नाही.कर्जमाफी झालेली नाही,त्याचबरोबर शेत विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून याविरोधात आज महाविकास आघाडीच्या नेते,आमदारांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले व राज्य सरकारचा निषेध केला.

यावेळी शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो! राज्य सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय!शेतकरी विरोधी सरकार हाय हाय!अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे फलक यावेळी दर्शविण्यात आले.

           याप्रसंगी विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना प्रतोद सुनील प्रभू,आ. जयंत पाटील, आ. नाना पटोले, आ. बाळासाहेब थोरात, आ. अजय चौधरी,आ. वर्षा गायकवाड,आ. वैभव नाईक आदींसह महाविकास आघाडीचे नेते,आमदार उपस्थित होते.


Spread the love

Related posts

पॅलेस्टाईनच्या समर्थनानंतर लोकसभेत गुंडगिरी दिसल्यास आश्चर्य नाही !- कर्नल आर.एस्.एन्. सिंह, संरक्षण विशेषतज्ञ, दिल्ली

news

इंडिया प्रोटेक्टीव्ह पेन्ट व माऊली ग्रामविकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.

news

भारत देश २०४७ पर्यंत इस्लाम राष्ट्र करण्याचा पी.एफ.आय., सिमी, इंडीयन मुजाहिद्दीन, रझा अकादमी संघटनांचा डाव होता ! नितेश राणे

news

Leave a Comment