स्टोरी

बांद्यात श्री विठ्ठल दर्शनाला भाविकांची गर्दी

Spread the love

बांदा प्रतिनिधी:  बांदा येथिल प्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिकी एकादशीला मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला.या सोहऴ्यात हजारो भाविकांनी श्री विठुरायाचे दर्शन घेतले .यानिमित्त मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.पहाटे पाच वाजता काकडआरतीने हा सोहऴा आरंभ झाला.  त्यानंतर दर्शनास सुरवात झाली. सकाळपासुनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी वाजतगाजत उत्सवमुर्तीचे मंदिरात आगमन झाले. त्यानंतर श्री विठ्ठल सोहिरा महिला भजन मंडळाच्या भजनसेवेचा कार्यक्रम झाला. ७ वाजता नित्य सायंआरती झाली.

 

रात्रो श्रींचा पालखी प्रदक्षिणा सोहळा तसेच  आजगांवकर दशावतार मंडळाच्या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहऴ्याचा लाभ घेतला

 

 

 


Spread the love

Related posts

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळू माफियांना ठणकावले!

news

मसुरे कावावाडी येथे ९ डिसेंबरला हरिनाम सप्ताह….!

news

पर्यावरणाशिवाय जगणे अशक्य!

news

Leave a Comment