स्टोरी

सियाचीन येथील सैन्य तळावर वीरमरण आलेले अक्षय लक्ष्मण गावते हे पहिले ‘अग्नीवीर’ !

Spread the love

२३ ऑक्टोबर वार्ता: जगातील सर्वांत उंच सैन्य तळ असलेल्या सियाचीन येथे तैनात भारतीय सैनिक अक्षय लक्ष्मण गावते यांना वीरमरण आले. देशासाठी प्राणार्पण करणारे ते पहिले ‘अग्नीवीर’ झाले आहेत. अक्षय हे भारतीय सैन्यातील ‘फायर अँड फ्यूरी’ या विभागात कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.काराकोरम पर्वतरांगेत जवळपास २० सहस्र फूट उंचीवर असलेल्या सियाचीन हिमनदीच्या परिसरात जगातील सर्वांत उंच सैन्य तळ आहे. येथे भारतीय सैनिकांना प्रचंड थंड वातावरणाला तोंड द्यावे लागते. जून मासात आग लागण्याच्या कारणावरून येथील सैन्य तळावर एका सैनिकाचा मृत्यू झाला होता, तर ३ सैनिक घायाळ झाले होते.

 

‘अग्नीवीर’ ही भारतीय सैन्यात सैनिकांची ४ वर्षांसाठी भरती करण्यासाठीची शासनाची योजना असून यांतर्गत केवळ सैनिकांची नियुक्ती केली जाते. यात सैन्याधिकार्‍यांचा समावेश नसतो. या योजनेच्या अंतर्गत तैनात सैनिकांना ‘अग्नीवीर’ नावाने संबोधित केले जाते.


Spread the love

Related posts

आंगणेवाडी आज पाच एकांकिकांचे सादरीकरणहोणार..! आंगणेवाडी नाट्य मंडळाच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजन.

news

अयोध्या येथे श्रीरामाच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा…!

news

सरकारचे सांस्कृतिक धोरण अस्थिर – संमेलनाध्यक्ष कवी अजय कांडर..! कोकणभूमी साहित्य कला संमेलनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

news

Leave a Comment