स्टोरी

निसर्गोपचाराने शरीराची संपत्ती सांभाळा! डॉ. स्वागत तोडकर

Spread the love

मनसेच्या वतीने मालवण येथे मोफत मार्गदर्शन कार्यक्रम….

 

मालवण: मानवी जन्म जीवनाचा आनंद घेण्यासाठी आहे. मात्र माणसे नेहमी ताण तणाव घेऊन जगत असतात. यातूनच आजरांची निर्मिती होत राहते. विविध आजारांवर पूर्वजानी व ऋषीं मुनींनी आयुर्वेद व निसर्गोपचाराचे महत्व सांगून ठेवले आहे. ते समजून घेणे गरजेचे आहे. आजारांचा विचार न करता नियमित निसर्गोपचाराच्या साहाय्याने हसत खेळत आयुष्य जगणे महत्वाचे आहे. निसर्गोपचारातून शरीराची संपत्ती सांभाळा, असे प्रतिपादन प्रसिद्ध निसर्गोपचार स्वागत तोडकर यांनी मालवण येथे बोलताना केले.

 

अनेक छोट्या छोट्या आजारांसाठी लोकांना डॉक्टरकडे धाव घ्यावी लागते. मात्र याच आजारांवर औषधी वनस्पतीच्या आधारे घरगुती उपाय करता येतात. याच दृष्टीने मनसेतर्फे माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून आरोग्य धनसंपदा या हसत खेळत घरगुती उपचाराचे मोफत मार्गदर्शन कार्यक्रम मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात संपन्न झाला. यावेळी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते निसर्गोपचार तज्ज्ञ व व्याख्याते स्वागत तोडकर यांनी मार्गदर्शन केले.


Spread the love

Related posts

सावंतवाडी तालुका भंडारी समाजाच्या अध्यक्षपदि प्रसाद अरविंदेकर यांची निवड…! उपाध्यक्षपदि गुरूनाथ पेडणेकर यांची निवड.

news

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे कृष्ण जन्माष्टमी!

news

श्री स्वामी सेवामार्गातर्फे नाशिकमध्ये जिल्हास्तरीय ‘सेल्फ डिफेन्स’ प्रशिक्षण

news

Leave a Comment