स्टोरी

ब्राझीलमधील विमान दुर्घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू!

Spread the love

१७ सप्टेंबर वार्ता: ब्राझीलमधील अ‍ॅमेझॉन राज्यातील बार्लेसोल प्रांतामध्ये विमान दुर्घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये विमानाच्या वैमानिकाचा आणि एका क्रू मेंबरचाही समावेश आहे. विमान कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रसासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून विमानाच्या ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. विमान अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमानाचा ब्लॅकबॉक्स मिळाल्यावर सर्व काही स्पष्ट होईल.

 

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. विमान कोसळले त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. खराब हवामान आणि कमी दृष्यमानता यामुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता आहे.


Spread the love

Related posts

कोकणात दापोली तालुक्यात आढळला ‘रामगड किल्ला’!

news

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा चतुर्थ दिवस! कठुआ बलात्कार प्रकरण:

news

भाजप नेते व पदाधिकारी यांच्या गुंडगिरीमुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कमकुवत..! आ.वैभव नाईक

news

Leave a Comment