स्टोरी

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न!

Spread the love

६ सप्टेंबर वार्ता: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बुधवार दि. सप्टेंबर २०२३ पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत खालील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

१) मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणे येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत

२) मुंबईमध्ये जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव

३) राज्यात सायबर सुरक्षेसाठी 837 कोटींचा प्रकल्प

४) आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. एनसीडीसीपेक्षा कमी व्याजदरात कर्ज

५) केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट

६) मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पाऊस आणि पाण्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 81.07 टक्के पाऊस झाला असून कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते नियोजन काटेकोरपणे करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

 

राज्यात 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान केवळ 24.05 म्हणजे सरासरी 13.60 टक्के पाऊस पडला आहे. 2579 पैकी 446 महसुली भागात 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला आहे.

 

महाराष्ट्रात 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. नियमानुसार पीक विम्याचा अग्रिम, पिण्याचे पाणी, चारा उपलब्धता यासाठी काटेकोर नियोजन करावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.

 

पावसाअभावी पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यास शासनाचे प्राधान्य आहे. पीक विम्याची अग्रिम रक्कम कशी देता येईल याचे चांगले नियोजन करावे. किती नुकसान झाले आहे हे अचूकरित्या काढणे, यंत्रणांमध्ये समन्वय राहील हे पाहण्याचे निर्देश देतानाच पिण्याच्या पाण्याचे आरक्षण महत्त्वाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत करता येईल हे आम्ही पहात आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


Spread the love

Related posts

जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे “उपशामक काळजी” कार्यक्रम साजरा.

news

मसुरेच्या दत्तप्रसाद पेडणेकर यांना सर्वोत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रदान….!

news

शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन तेली व परशुराम उपरकर यांचा आमदार वैभव नाईक उद्या कुडाळ येथे करणार सत्कार

news

Leave a Comment